Devendra Fadanvis Criticize Anil Deshmukh : अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांच्या विरोधात काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला आणून दिले होते. त्यामुळे ते खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील. तर या सर्व गोष्टी मी पब्लिक करील. कारण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. असा इशारा फडणवीसांनी देशमुखांनी केलेल्या दबावाच्या आरोपांवर दिला आहे.
राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये गिरीश महाजनांवर मोका लावण्यासाठी वारंवार गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता. या संदर्भातील ऑडिओ व्हिज्युअल्स पुरावे मी स्वतः दिले होते. मात्र श्याम मानव यांनी माझ्यावर केलेले हे आरोप सुपारी बाज लोकांच्या सांगण्यावरून केले आहेत. जे माझ्या विरोधात एक इकोसिस्टीम चालवत आहेत.
तरुणांना महिन्याला मिळणार पाच हजार रुपये, काय आहे सरकारची इंटर्नशिप योजना ?
तसेच अनिल देशमुख यांच्यावरती शंभर कोटींच्या वसुलींचे आरोप लागले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होतं. आज पर्यंत मी बोललो नाही. कारण माझा एक सिद्धांत आहे. मी कुणाच्याही नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर मी त्याला सोडत नाही. तर अनिल देशमुख यांच्या विरोधात काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला आणून दिले होते. ज्यामध्ये ते उद्धव ठाकरे, शरद पवार, आज माझ्यावर जे आरोप केले त्याबाबत तसेच वाझेंवर यांच्याबाबत काय बोलत आहेत? हे सर्व रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे जर कोणी रोज खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील. तर या सर्व गोष्टी मी पब्लिक करे कारण देवेंद्र फडणवीस कधीच पुरावे शिवाय बोलत नाही.
नेमकं प्रकरण काय आहे?
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दबाव टाकण्यात आला होता. असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे.