Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये आज 19 जूनला ठाण्यात मोदी@९ महाजनसंपर्क अभियानानिमित्त भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, आज खरं म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहेत. एक कार्यक्रम ज्यांनी शिवसेना वाचवली त्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. (Devendra Fadanvis Criticize Udhav Thackrey )
वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना धक्का, महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार
ज्यावेळी बाळासाहेबांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा मी शिवसेनेची दुकान बंद करीन. पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही. पण काल उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही आम्हाला लोटलं पण नाही तुम्हाला ती खुर्ची बोलवत होती. ‘आ जा आ जा’ म्हणून गाणं म्हणत होती. तुम्ही ही ‘आ रहा हू’ म्हणत तिच्याकडे गेले.
News Area India Survey : बीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादी 50-50, कोणाच्या जागा धोक्यात?
जनतेने भाजप-शिवसेनेच्या युतील बहुमत दिलं होतं. तेव्ही तुम्ही भाजपसोबत आणि युती, हिंदूत्वासाठी मत मागितली होती. पण निवडणुक झाली आणि निती बदलली. खुर्चीसाठी विचारांशी सौदा केला. खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली. आमच्यासोबत आमच्या मतांवर निवडूण आलात आणि आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. खुर्ची आणि मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे पहिली गद्दारी तुम्ही केली.
एकनाथ शिंदे हे ज्यांच्यासोबत मत मागितले त्यांच्यासोबत आले आहेत. ज्या विचारांसाठी त्यांना लोकांनी मत दिली त्यासाठी ते भाजपसोबत आले. त्या 40 आमदारांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत मत मागितले नव्हते. मात्र तुम्ही मोदींचे मोठे-मोठे फोटो लावून मतं मागितली आणि निवडणुकीनंतर गद्दारी केली. इतिहासात ऐकलं होतं. संताजी-धनाजीचं नाव जरी घेतलं तरी मुघल घाबरत होते. त्यांना सर्वत्र तेच दिसत होते. तशीच अवस्था मोदी आणि शाह यांना पाहून आता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसची झाली आहे.
तुम्ही मोदींवर बोलता ठाकरे म्हणाले की, हे वर्ष खोके, गद्दारांचे वर्ष होते. खोको गद्दार सोडा पण तुमच्या अडीच वर्षांचा लेखाजोखा घेतला तर तुमचे अडीच वर्ष हे कुंभकर्णाचे अडीच वर्ष होते. कारण तुम्ही झोपेतुन कधी जागेच झाले नाही. मुख्यमंत्री अडीच वर्षांत दोनदा मंत्रालयात गेले. हे मी नाही शरद पवार म्हणतात. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.