Download App

Akola Riots : काही लोक आगीत तेल ओततात, सगळं बाहेर आणणार; अकोला दंगलीवरून फडणवीसांचा निशाणा

Devendra Fadanvis on Akola Riots : अकोला शहरात शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. या दंगलीमध्ये आत्तापर्यंत दोन्ही गटातील 10 जण जखमी झाले असून दोन पोलीसही जखमी झाले आहेत. अकोला शहराच्या विविध भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. दंगलखोरांकडून पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात दोन गट एकमेकांना भिडले. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात पाच पोलीस (Police) जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

अकोल्यात दंगलीनंतर स्मशाण शांतता; व्हिडीओ आला समोर, नेमकं घडलं काय?

यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दंगल झालेल्या दोन्ही ठिकाणी पोलीस पुर्णपणे अलर्ट मोडवर होते. त्यामुळे कुठेही काही दुर्घटना घडली नाही. याबद्दल माहिती मिळताच सर्व ठिकाणची पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आम्ही महाराष्ट्रात कुणालाही दंगली घडवू देणार नाही. तसा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांना अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही. तर हे 100 टक्के जाणीवपूर्वक होत आहे.

दंगलीनंतर शेवगावची झाली पोलीस छावणी

याला कुणाची तरी फूस आहे. जाणूनबुजून राज्यातील कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते आम्ही सफल होऊ देणार नाही. काही प्रमाणात या दंगलींना राजकीय पाठिंबा आहे. काही लोक आगीत तेल ओततात, सगळं बाहेर आणणार. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते माध्यमांशी बोलत होते.

Tags

follow us