Download App

केंद्रीय नेतृत्वाशी बोलणं झालंय पण…; खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadanvis यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadanvis on Eknath Khadase BJP Entry : केंद्रीय नेतृत्वाशी बोलणं झालं आहे. ते ज्या दिवशी म्हणतील त्या दिवशी आम्ही एकनाथ खडसेंचा ( Eknath Khadase ) प्रवेश करू. तसेच त्यांनी नेतृत्व माझ्या हातात असल्याने त्यांनी माझ्यावरती राग काढला. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी दिली. ते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लल्लनटॉप या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप प्रवेश रखडलेल्या एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

BJP ने पूनम महाजनांचे तिकीट का कापले? फडणवीसांना सांगितलं नेमकं कारण…

या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला. त्यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रीय नेतृत्वाशी काही अडचण नाही. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत आहे. त्याचबरोबर गेल्यास महिन्यात त्यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये येत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. मात्र अद्याप देखील त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही.

संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी ठाकरेंनाही ब्लॅकमेल केलं; नितेश राणेंचा पलटवार

याबद्दल सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्याबाबत माझं केंद्रीय नेतृत्वाशी बोलणं झालं आहे. ते ज्या दिवशी म्हणतील त्या दिवशी आम्ही त्यांच्या प्रवेश करू. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. तसेच आमची वैयक्तिक कोणाशीही दुश्मनी नाही. तसेच एकनाथ खडसे यांच्या केसशी माझा काहीही संबंध नाही. मात्र राज्यातील नेतृत्व माझ्या हातात असल्याने त्यावेळी त्यांनी माझ्यावरती राग काढला. मात्र माझी काहीही हरकत नाही. कारण जेव्हा पक्ष आपल्याला मोठ्या पदाची जबाबदारी देतो. त्यावेळी दोन बोलणी देखील ऐकून घ्यावी लागतात. असं म्हणत फडणवीसांनी गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप प्रवेश रखडलेल्या एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान याच मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे त्याचबरोबर विनोद तावडे या नेत्यांना महाराष्ट्राचे राजकारणातून साईडलाईन केले गेले आहे का? याबाबत देखील प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी केल्या दहा वर्षांपासून माझे चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर 2019 ला विधानसभेचे तिकीट देताना तावडे यांना केंद्रीय नेतृत्वाकडून राष्ट्रीय जबाबदारी सोपवण्यासाठी तिकीट नाकारण्यात आलं होतं.

follow us