ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीत उद्धव ठाकरे मेहबुबा मुफ्तींच्या (Mehbooba Mufti) शेजारी बसलेले दिसले. यावरून फडणवीसांनी ठाकरे हे सत्तेसाठी आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी मुफ्तींच्या बाजुला जाऊन बसले, अशी टीका केली होती. त्यानंतर ठाकरेंनीही प्रत्युत्तर देतांना तुम्हालाही कुटुंब आहे, असा इशारा दिला होता. दरम्यान, आज पुन्हा एकदा फडणवीसांना ‘तुमको मिर्ची लगी तो क्या करू? ज्यांच्या आलमारीत सांगडे, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो, अशी टीका केली. (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray; Don’t pretend to be a moneylender)
केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चंद्रपुरातील एका सभेला संबोधित करतांना फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या तत्कालीन सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मागील अडीच वर्ष तुम्ही 100 कोटींची वसुली करणारे, फेसबुकवर असलेले, घरी बसलेले सरकार पाहिले. मात्र, आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आले आहे. काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटले तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी, ‘तुमको मिर्ची लगी तो क्या करू?’ मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही राहता. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. ज्यांच्या आलमारीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो. ते सांगाडे बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. मी कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर सोडत नाही, असा थेट इशारा फडणवीसांना ठाकरेंना दिला.
मलायका अरोराने लावला हॉटनेसचा तडका, पाहा फोटो
आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला शह देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आलेत. त्यांची संयुक्त बैठक पाटणा येथे झाली. यावरूनही फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक उपलब्धी आहेत. पण सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आणले, ही सुद्धा एक उपलब्धीच म्हणावी लागेल. या सर्व परिवारवादी पक्षांना फक्त कुटुंबाची चिंता आहे, तर मोदींचा परिवार हा संपू्र्ण देश असल्याचं फडणवीस म्हणाले.