तुमच्यासारखी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते जपानला गेले नव्हते, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जपान दौऱ्यावरुन जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं. गेल्या […]

"उद्धव ठाकरेंना अनेक आजार, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली"; बावनकुळेंचं जशास तसं उत्तर

"उद्धव ठाकरेंना अनेक आजार, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली"; बावनकुळेंचं जशास तसं उत्तर

Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जपान दौऱ्यावरुन जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं. गेल्या महिन्यात 15 दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले ते देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत. फडणवीसांचा जपान दौरा तुमच्यासारखा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नव्हता तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी होता, असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाला आहात. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्हाला सडकछाप शब्दांचा वापर करावा लागत आहे. तुमचे हे नैतिक अधःपतन महाराष्ट्र बघत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

चंद्राला हिंदू राष्ट्र आणि शिवशक्ती पॉइंटला राजधानी घोषित करा; स्वामी चक्रपाणी यांची मागणी

नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घमेंडियाला घरघर लागली आहे. त्यामुळे तुम्ही हर घर मोदी अभियानावर टीका करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मोदी आणि फडणवीस असलेल्या जनतेच्या प्रेमामुळेच तुमच्या अहंकाराचा येत्या निवडणुकीत पराभव होईल, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Exit mobile version