Download App

सोमय्या कथित व्हिडिओवरून दानवेंचं टीकास्त्र; फडणवीस म्हणाले, ‘हे प्रकरण दाबले जाणार नाही’

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या कथित अश्लील व्हिडिओवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचं तापलं आहे. हा व्हिडिओ चॅनेलवर दाखवला जात आहे. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली. या कथित व्हिडिओवर आज विधान परिषदेच्या सभागृहातही (Assembly Hall) प्रतिक्रिया उमटल्या. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Denve) आणि अनिल परब (Anil Parab) यांनी सभागृहात हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत आणि चौकशीची मागणी केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी केली जाईल,याची ग्वाही दिली. (Devendra Fadnavis on Kirit Somayya video and reacted on ambadas danve Accusation)

सोमय्या महाराष्ट्राचा गद्दार
आज विधानपरिषदेत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, आपले राज्य फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे आहे. असं असतांना नैतिकतेची शिकवण देणाऱ्या सत्ताधारी राजकीय पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यांचे काही अश्लील व्हिडिओ समोर आलेत. काही माता-भगिनींनी हिंमत करून हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवला. त्या भगिनींना मी सलाम करेन. कारण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला केंद्राची सुरक्षा आहे. संबंधित भाजप नेत्याने काही महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला. माझ्याकडे 8 तासांचे व्हिडिओ आहेत. मी ते स्पीकरला देईन. ज्याने हे कृत्य केले तो महाराष्ट्राचा गद्दार आहे. मी स्पष्टपणे त्या व्यक्तीचे नाव घेतो, त्याचे नाव किरीट सोमय्या आहे. त्यांनी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे.  किरीट सोमय्या महाराष्ट्राचा गद्दार आहे. माझ्याकडे त्याचा एक पेन ड्राइव्ह आहे. त्यात अतिशय घृणास्पद व्हिडिओ आहेत. अशा लोकांवर सरकार कारवाई करणार का? त्याचे संरक्षण काढून घेणार का, की केंद्र सरकारकडून सुरक्षा वाढवणार? असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी दानवेंनी केली.

सचिन अहिर भाजपसोबत येतील आणि परबांची अवस्था अश्वत्थामासारखी होईल; मुनगंटीवारांची भविष्यवाणी 

तर अनिल परब यांनी व्हिडिओची सत्यता समोर आली पाहिजे. तुम्ही एसआयटी लावा नाहीतर रॉ लावा, पण ती महिला कोण आहे, हे समोर आलं पाहिजे. मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, असं सोमय्या यांनी पत्रात सांगितलं. याचा अर्थ हा व्हिडिओ खरा आहे. त्यामुळं गृहमंत्र्यांकडे मागणी सेक्युरीटी काढून घ्या… आता कशाला सेक्युरीटी कशाला हवीय? असा सवाल परब यांनी केला.

फडणवीस काय म्हणाले?

तर दानवे आणि परब यांनी केलेल्या मागणीवर बोलतांना फडणवीस म्हणाले की, जो विषयी अंबादास दानवेंनी मांडला तो विषय अत्यंत गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. हा जो प्रकार समोर आला, यासंदर्भात आपल्याकडे असलेल्या तक्रारी द्या. याची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. महिलेची ओळख सांगता येत नाही. पण, या केसपुरती ही महिला कोण आहे हे शोधून काढू. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. हे प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, सोमय्यांनीही पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. उच्च स्तरावरची चौकशी केली जाईल. असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us