मोदींना जेवढ्या शिव्या देतायत तेवढे ते प्रसिद्ध होतायत; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची सभा नुकतीच जळगावात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी केली होती. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे हे जेवढे मोदींना शिव्या देतायत तेवढे मोदी अजून प्रसिद्ध होतायत. म्हणून त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून ठाकरे यांचे नैराश्य वाढते आहे, […]

Untitled Design   2023 04 24T185817.863

Untitled Design 2023 04 24T185817.863

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची सभा नुकतीच जळगावात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी केली होती. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे हे जेवढे मोदींना शिव्या देतायत तेवढे मोदी अजून प्रसिद्ध होतायत. म्हणून त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून ठाकरे यांचे नैराश्य वाढते आहे, अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना शाब्दिक टोला लगावला आहे.

एका महत्वाच्या प्रशासकीय बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरेंनी मोदींवर केलेल्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ठाकरे यांच्या भाषणामध्ये केवळ निराशा होती. तसेच त्यांच्या भाषणामध्ये तोच तो पणा होता. एकही नवीन मुद्दा ते बोलले नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटते काही नेते हे केवळ शिवराळ भाषा वापरतात.

राज्याच्या विकासावर एक शब्द बोलत नाही, शेतकऱ्यांच्या विकासाबाबत कधी काही बोलणार नाही, तसेच रोजगारावर कधीही बोलणार नाही. त्यांच्या एकूण राजकीय जीवनात एकही विकासाचा प्रकल्प ते तयार करू शकले नाही जे ते महाराष्ट्रासमोर दाखवू शकतात.

यामुळे त्यांच्या या भाषणातून त्यांच्याच नैराश्यामध्ये वाढ होत आहे. मोदींची वाढती प्रसिद्धी पाहून ते मोदींना शिव्या देत आहे. मात्र तुम्ही जेवढ्या मोदींना शिव्या देत आहेत तेवढे ते प्रसिद्ध होत आहे. मोदींची वाढतो प्रसिद्धी पाहून हे नैराश्यात जात असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रार्थना बेहेरेच्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेच्या माध्यमातून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी या सभेच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आता विरोधकांच्या टीकेला सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींकडून उत्तर दिले जात आहे.

Exit mobile version