Devendra Fadnavis on Prakash Ambedkar : 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. दरम्यान, त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis said Prakash Ambedkar is trying to mislead the direction of politics)
मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किलबिलाट एम्बुलन्सचे उद्घान झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात यापूर्वीही लोकांनी अर्ज केले होते. त्यावर आयोगाने निर्णय घेतले आहेत. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. त्यांना हे ठाऊक आहे की, कुणाला चौकशीला बोलावलं जातं, आणि कुणाला बोलावलं जातं नाही. प्रकाश आंबेडकर हे फक्त राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
अनिक्षाची अमृता फडणवीसांना मोठी ऑफर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा
प्रकाश आंबेडकर यांना त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी आयोगाने 5 जून रोजी बोलावले होते. त्या पत्राला उत्तर देताना त्यांनी आयोगाला कळवले की, कामाच्या पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नाही. याच पत्रात प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरगाव चौकशी आयोगाकडे, भिमा कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक यांची साक्षही घ्यावी, असं आंबेडकर यांनी आयोगाला लिहिलं. त्याला फडणवीसांनी उत्तर दिलं.
यावेळी बोलतांना महाविकास आघाडीवरही फडणवीसांनी टीका केली. ते म्हणाले, राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत, अशी ओरड विरोधक करत असतात. पण, आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक होत आहे. परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात भाजपचं सरकार असतांना राज्यात सर्वाधिक गुंतवणूक झाली होती. पण आम्ही गेल्यानंतर 2020 ते 2022 या काळात राज्यातील विदेशी गुंतवणूक फारच कमी झाली होती. मात्र, विरोधक आताच्या सरकारवर टीका करतात. आमच्या सरकारने परकीय गुंतवणीच्या बाबतीत गुजरात आणि कर्नाटला मागे टाकले आणि महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं, असं फडणवीस म्हणाले.