Download App

…तर राहुल गांधींसाठी संपूर्ण थिएटर बुक करेल; स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिल्यावर फडणवीसांचा टोमणा

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरक (Swatantra Veer Savarkar Movie) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सावरकरांची भूमिका बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने साकारली आहे. या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींसाठी (Rahul Gandhi आपण हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर बुक करू, असा टोमणा लगावला.

नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! अमरावतीतून आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात

राहुल गांधी यांनी अनेकवेळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सावरकरांवर टीका केल्यानं भाजपनेही राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तरीही सावकरांविषयी राहुल गांधी आणि कॉंग्रेसकडून सातत्याने टीका केली जाते. हाच धागा पकडून फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी माझ्या स्वत:च्या खर्चाने संपूर्ण थिएटर बुक करेल. राहुल गांधींना हा सिनेमा पाहता येईल, अशी सगळी व्यवस्था करेन, असं फडणवीस म्हणाले.

बारामतीत नणंद-भावजयमध्येच फाईट; सुळेंच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर 

पुढं बोलतांना ते म्हणाले, आजच्या कमर्शियल काळात सावरकरांवर सिनेमा येतो, ही चांगली बाब आहे. या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सावरकरांचं जात-पात, धर्म, विज्ञान याविषय़ीचं लेखन चिंतनशील आहे. त्यांनी क्रांतीकारंकांची एक फळी तयारी केली होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे होते. सावरकर हे समाजसेवक, देशभक्त होतेच. याशिवाय, त्यांनी मराठी भाषेला समृध्द करण्याचं कामंही केल्यचां फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट आज अंधेरीतील फन रिपब्लिक सिनेमा थिएटरमध्ये पाहिला. यावेळी चित्रपटाचे मुख्य कलाकार रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे हेही उपस्थित होते. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राहुल गांधींसाठी थिएटर बुक करू, अशी प्रतिक्रिया दिली.

तर स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटावरून भाजपने कॉंग्रेसने डिवचलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजंदर सिंह तिवाना यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावकरकर चित्रपटाची तिकीटं पाठवली आहेत. शिवाय हा चित्रपट त्यांना बघायला सांगून यामुळं तुमचे डोळे उघडीत, असा टोलाही लगावला.

follow us