Download App

Shinde-Fadanvis : कांदा अनुदानाच्या निर्णयावरून धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले

मुंबई : राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला अनुदान जाहीर केले मात्र यामध्ये 31 मार्च पर्यंत विकल्या गेलेल्या कांद्यालाच हे अनुदान जाहीर करण्यात आल्याने 1 एप्रिलपासून कांदा विकणारा कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे.

धनंजय मुंडेंनी यावर ट्विट करत म्हटले की, ‘राज्य शासनाने कांद्याला जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ 31 मार्च पर्यंत विक्री झालेल्या कांद्यालाच मिळेल असा फतवा शासनाने काढला होता. राज्यसरकारच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कात्रीत पकडले आहे. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे.

त्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी.नाशिक जिल्ह्यात या अडवणुकीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा कांदा बदमाश व्यापाऱ्यांनी 25 पैसे प्रतिकिलोने घेतला.

Uddhav Thackeray यांचा शिंदे गटावर हल्लाबोल : गेल्या वर्षी एक ‘कांदा’ ५० खोक्याला विकला गेला!

त्या शेतकऱ्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील? शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच अनुदानासाठी पात्र कांदा विक्रीस किमान 15 दिवसांची मुदतवाढ करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर विकलेल्या कांद्याला देखील अनुदान देण्यात यावे.’ अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.

Tags

follow us