Download App

एरवी न बोलणारे वळसे पाटील तांबेंच्या डबल गेमवर बोलले…

मुंबई : एरवी कधीही न बोलणारे दिलीप वळसे पाटील सत्यजित तांबे यांच्या डबल गेमवर बोलले आहेत. ट्विट करुन त्यांनी भाजपला डिवचलंय. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता एक नवा ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही. भाजपकडून अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही, असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

आज सकाळीच ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. सत्यजित तांबे यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपसह इतर पक्षांची मदत घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारत आपल्या मुलाचा सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. तसेच या मतदारसंघात भाजपकडून उमेदवार जाहीर न केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळालंय. मतदार पदवीधर आहेत, तुमच्या खेळात कार्यकर्त्यांचा फुटबॉल होतोय, असं म्हणत ट्रोल होताना दिसतंय.

Tags

follow us