ShivSena Anniversary : आताचे आव्हान आपल्याच लोकांनी तर दिले आहेच पण एकेकाळच्या जवळच्या मित्रांने देखील दिले आहे. हे आव्हान आपण मोडणारच आहेत. हे आव्हान मोडल्यानंतर आव्हान देणारा शत्रू शिल्लक ठेवणार नाही. आपल्या आयुष्यातील हे शेवटचं आव्हान आहे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की ही एकजूट पैसे देऊन आलेली नाही. 57 वर्षांची ही तपश्चर्या आहे. घाम गाळून, रक्त सांडून हे सगळे शिवसैनिक उभा केलेले आहेत. त्यांनी तुम्हाला उभा केलं होतं. आयत्या बिळावर फना काढून बसलात म्हणजे नागोबा झालात असे वाटत असेल पण जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत भाजप दूध पाजतील, पुंगी वाजवतील नंतर टोपलीत घालून देतील सोडून, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
हे सरकार आल्यापासून पाऊस लांबणीवर गेला आहे. पण पाऊस लवकर येऊ दे, बळीराजा खुश होऊ दे, बाळीराजावर कोणतेही संकट येऊ देऊ नको हे देवालाच साकडे घालावं लागणार आहे. कारण जर का ह्यांचे राज्य असेल आणि बळीराजावर संकट आलं तर मदत अजिबात होणार नाही. मागील एक वर्षातील अनुभव आहे. ह्यांचा जाहिरातीवर जेवढा खर्च होतो तेवढी मदत शेतकऱ्यांना दिली असती तरी शेतकरी सुखी झाला असता. पण वारेमाप उधळपट्टी चालली आहे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
अंधभक्त, विश्वगुरुंना व्हॅक्सिन देण्याची गरज, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मराठी माणसाच्या आयुष्यात सतत संघर्ष होता. त्यांच्या आयुष्यात कुठेतरी हलकेफुलके क्षण यावेत म्हणून शिवसेना प्रमुखांनी मार्मिक काढले होते. त्या मार्मिकमध्ये हास्यजत्रा यायची आणि देशाचे राजकारण सांगून जायची. शिवसेनेची सुरुवात झाल्यानंतर मोठमोठ्या जाहिराती नव्हत्या द्याव्या लागत. कोण निघाले गोरेगावला, तिकडून सुरतला, गुवाहाटीला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
News Area India Survey : बीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादी 50-50, कोणाच्या जागा धोक्यात?
कोर्टाचा निकाल लागलेला आहे. संजय राऊत यांनी अध्यक्षांचे वर्णन बरोबर केलेले आहे. तो निकाल लागल्यानंतर यांना फिरतीचा अनुभव उपयोगाला येईल कारण टुरिस्ट कंपनी काढला चांगले पडेल, सुरतेला गेलात तर कुठं राहायचं? रेडा कुठं कापायचा? टेबलावर कुठं नाचायचं? टेबलावर नाचायचं असेल तर किती पैसै द्यायचे?, त्यानंतर दिल्लीत मुजरा कसा करायचा? एवढे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.