Prakash Aambedkar : फ्रेंडशिप डे निमित्त वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधान आले होते. या पोस्टमध्ये त्यांनी आगामी निवडणुकांसाठी आपल्यासोबत येण्याची इतर पक्षांना ऑफरच दिली होती. त्यांच्या या पोस्टबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी भाजपसोबत जाणार का? यावर आपली भूमिका स्पष्ट केली. (Door open for BJP but only for Tea not Politicle Allince Prakash Aambedkar Offer )
मोठी बातमी : राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल, अधिसूचना जारी
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फ्रेंडशिप डे होता. म्हणून मी ती पोस्ट केली होती की, ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे. माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. राजकीय मैत्री असो किंवा वैयक्तिक मात्र असो. भाजपने घरी चहा प्यायला आलं तर दरवाजे उघडे आहेत. पण राजकीय नाही. हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर भाजपसोडून इतर पक्षांसाठी होती. हे स्पष्ट झालं आहे.
भाजपने घरी चहा प्यायला आलं तर दरवाजे उघडे, पण…; प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर
पुढे आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत जाणार का? प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की त्याबद्दल उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवारांना विचारा. तसेच संभाजी ब्रिग्रेडसोबत ठाकरे गटाचा मेळावा आहे. कोणी कोणाबरोबर मेळावा घ्यावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर संभाजी ब्रिग्रेड त्यांच्या अगोदरच सोबत आहे. त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. असं उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं.
पुढे ते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर विचारले असता म्हणाले, नेमाडे हे गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. ज्यांचा ज्यांचा जसा अभ्यास आहे. तसा त्यांना इतिहास कळतो. तर औरंगजेब वाद कोणाला हवा आहे? मी औरंगजेबाच्या मजारीवर गेल्यानंतर शांतता झालेली आहे. हे तुम्ही पाहिले आहे. जयंत पाटलांच्या बाबतीत ते म्हणाले, जे बॉम्ब फुटणार होते ते मी आधीच सांगितले होते. आता त्यात काय राहिलेलं नाही ते बॉम्ब फुटो किंवा न फुटो. विजय वडेट्टीवार कॉपी मास्टर आहेत. ओरिजनल काय असेल तर मला विचारा. कॉपी मास्टरचा कशाला मला विचारता? असं उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं.