Download App

2024 ला राज्यात महाविकास आघाडीच सत्तेत येणार; खडसेंचा दावा

  • Written By: Last Updated:

Eknath Khadse On Chandrakant Patil : दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीसंदर्भात मोठं भाष्य केलं होतं. 3 पक्ष एकत्र येऊन लढते तरी, आमच्यापुढं आव्हान निर्माण करू शकणार नाहीत. कारण, पुढच्या वर्षात लोकसभा आणि विधासभा निवडणुका (Lok Sabha and Vidhansabha Elections) होणार आहेत. तोपर्यंत हे तीन पक्ष एकत्र राहणं कठीन आहे, असं पाटील म्हणाले होते. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीच सत्तारूढ होईल, असं ते म्हणाले.

सावरकरांसारख्या आणखीही अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत, असं बोलल्या जातं. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र दिसत असले तरी या तीन पक्षांत अंतर्गत वाद आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होऊ शकते. शिवाय, हे या तीनही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहेत. त्यामुळं हे पक्ष विचारांनी एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. त्याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. महाविकास आघाडीतील 3 पक्ष एकत्र येणं कठीण आहे. त्यामुळं ते आमच्यासमोर आव्हान निर्माण करू शकणार नाहीत, असं पाटील म्हणाले होते.

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, नाहीतर तुम्ही द्या; ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना खडसे यांनी सांगितले की, राज्यात तीनही पक्ष एकत्र राहतील आणि 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल. राज्यात महाविकास आघाडी ही मजबूत आहे. तीन पक्ष एकत्र राहणं अवघड आहे असे म्हणणं चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चुकीच आहे. 32 पक्ष हे एकत्र होते, देशभरातील 32 पक्ष एकत्र करून पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी राहिले आहेत. मग तीन पक्ष एकत्र न राहण्याचे कारण तरी काय? महाविकास आघाडीत वितुष्ट येणार नाही. 2024 मध्ये महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असं ते म्हणाले.

बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर बाळासाहेब म्हणाले होते की, बाबरी मशीद पाडली, त्याची जबाबदारी मी घेतो. पण, त्यावेळी अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? की बाळासाहेब तिथं गेले होते, असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, अयोध्येमध्ये रामाच मंदिर बांधांवे म्हणुन बाबरी मशीद तोडण्यासाठी जे काही झालेल आहे, मी स्व:ता त्याचा साक्षीदार आहे. दोन वेळा मी कारसेवक म्हणुन अयोध्येकडे गेलो होतो. 5 दिवस मी तुरंगामध्ये होतो. त्याठिकाणी पोलीसांचा भरपुर मार खाल्लेला आहे. मला माहित होत की, कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी हजर होते, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Tags

follow us