वाद शिगेला! बेडूक कितीही फुगला तरी…; बोंडेंची CM शिंदेंवर उघड टीका

Anil Bonde Criticizes Eknath Shinde : शिवसेनेकडून काल (दि.13) रोजी वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंनी भलीमोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उघडपणे टीका केली आहे. त्यांच्या या विधानामुळे सेना-भाजपमधील वाद आता आणखी शिगेला पोहचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेडूक कितीही हवा भरली […]

Narendra Modi Eknath Shinde

Narendra Modi Eknath Shinde

Anil Bonde Criticizes Eknath Shinde : शिवसेनेकडून काल (दि.13) रोजी वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंनी भलीमोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उघडपणे टीका केली आहे. त्यांच्या या विधानामुळे सेना-भाजपमधील वाद आता आणखी शिगेला पोहचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेडूक कितीही हवा भरली तरी तो हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

बोंडेंनी अशाप्रकारे टीका केल्याने त्यांनी एकप्रकारे शिंदेंची बेडकाशीच तुलना केली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे हे उत्तम मुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या आजूबाजुचे लोक त्यांना चुकीचे सल्ले देत असल्याचे बोंडे म्हणाले. शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे यांच्या या झोंबणाऱ्या टीकेनंतर आता सेना-भाजपमधील वाद आणखी वाढणार की भाजपच्या वरिष्ठांकडून शिंदेंची कानउघडणी केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यावेळी बोंडेंनी राष्ट्रवादीचाही चांगला समाचार घेतला. ते म्हणाले की, खोट्या बातम्या पसरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एक टीम आहे. खर म्हणजे आळंदीमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून नियम घालून दिला. प्रत्येक वारीमध्ये 75 लोक जातील. यात काही लोकांना घुसविले. जणीपूर्वक हुज्जत घातल्याचा दावा बोंडेंनी केला आहे.

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

देसाईंचा बोंडेंना सल्ला
दरम्यान, बोंडे यांच्या या टीकेवर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही आमची भूमिका कालच फडणवीसांना सांगितली असून, बोंडेंनी सामंज्यस्यानी घ्यावे असा सल्ला देसाई यांनी दिला आहे. तसेच घडलेला विषय संपवून 2024 च्या कामाला लागू असे देसाईंनी म्हटले आहे. तसेच युतीमध्ये पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करणार असल्याचे देसाई म्हणाले.

Exit mobile version