Download App

Eknath Shinde यांचे मुख्यमंत्रीपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते!, शरद पवार गटाचा दावा

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

NCP On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटातील 16 आमदारदांवर अपात्रतेची टांगली तलवार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार अपात्र ठरतील, असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, अशाचत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंचं सीएमपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला.

३० सप्टेंबरपासून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद संपर्क अभियानाला सुरूवात होणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता ते जनतेपर्यंत शरद पवारांचे विचार पोहोचवण्याचे काम होणार असल्याची माहिती प्रवक्ते तपासे यांनी कल्याण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलतांना त्यांना ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विचारले असता, ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारे. त्यानंतर सुनावणीला वेग आला आहे. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर नोव्हेंबरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांनी शेड्यूल्ड 10 नुसार कारवाई केल्यास एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते, असा दावा तपासे यांनी केला.

‘किस्से वर्ल्डकप’चे वर्ष 1983! सेलिब्रेशनसाठी उधारीची शॅम्पेन अन् उपाशी खेळाडू… 

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. या लोकसभा मतदारसंघात महायुतीचा कोणाही उमेदवार असला तरी दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये इंडिया अलायन्सला मोठा प्रतिसाद सर्वसामान्य जनतेतून दिसून येत आहे. त्यामुळं आगामी लोकसभा, विधानसभा तसेच नगरपालिका, व जिल्हा परिषद निवडणुकीत ‘इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येईल, यात कुठंलही दुमत नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कांदा निर्यात शुल्कावरूनही त्यांनी केंद्रसरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील आणि राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय.  केंद्र सरकार ४० टक्के निर्यात कर लावून शेतकऱ्यांचा कांदा सडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

रोजगार निर्मितीवरून तपासेंनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगार निर्मिती करण्यात आणि राज्यात उद्योग आणण्यात शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केला.

Tags

follow us

वेब स्टोरीज