Eknath Shinde : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अलीकडेच मोठा दावा केला. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. हा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणला होता असा दावा त्यांनी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केले.
‘…तेव्हा ते सर्व पक्षीय बैठकीला आले नाहीत’; CM शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा
एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, होय, ही वस्तुस्थिती आहे. मलाही अडवण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, कोंडी करणं हे मी समजू शकतो. मात्र, मी तर त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तरीही मला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे. मी यावर सविस्तर बोलेन, असं शिंदे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांवर मोठी जबाबदारी, राज्यातील हे अधिकार सोपावले
ठाकरे गटाला मी पाण्यात दिसतो…
यावेळी बोलतांना सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. मोगलांच्या घोड्यांना जसे संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे, तसं मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालं हे त्यांना अजून हजम झालं नाही. बसता, उठतो, स्वप्नातही मी त्यांना दिसतो. सरकार आज पडेल, उद्या पडेल असं ते सांगायचं. मात्र, आमचं सरकार मजबुतीने उभं आहे. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म का भरतात. पोस्टर्स का लागतात? असा सवाल त्यांनी केला.
सर्वपक्षीय बैठक बोलवावी या पवारांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, याआधी सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. आम्ही येणार-येणार अस विरोधक म्हणाले. पण, ते आले नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.