Eknath Shinde : तुम्ही देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) कलंक म्हणता, पण देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखवत फक्त पन्नास आमदार असतांना मला मुख्यमंत्री केलं. त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. याला मनाचा मोठेपणा म्हणतात, महाकलंक तर तुम्ही आहात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंवर केली. (Eknath Shinde on Uddhav Thackeray shivsena melava shinde take side of devendra fadanvis)
आज ठाण्यात शिवसेनेचा मेळावा झाला. या सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. सत्तेसाठी तु्म्ही बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी चिरडले. छत्रपती शिवाजी महाराज देखील दगाबाजांना थारा देत नव्हते. पण, तुम्ही बाळासाहेब आणि आणि मोदींचीचे फोटो लावून मतं मागितले आणि मतदारांनी निवडून दिल्यावर तुम्ही बाळासाहेबांच्या राजकीय विरोधकांसोबत मैत्री केली. ज्यानी निवडून दिलं, त्या मतदारांशी दगाबाजी कोणी केली? खरे गद्दार कोण? असा सवाल त्यानी केला.
राजकारणातून निवृत्ती घेतोयं, माजी आमदाराने तुरुंगातच घेतला निर्णय…
ते म्हणाले, ज्यांना बाळासाहेबांनी दूर ठेवले होते, त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही सत्तास्थानी विराजमान झाला. आम्हाला गद्दार म्हणता, पण आम्ही बोलत नाही. आमच्याकडंही बोलण्यासारखं आहे. पण, आमच्यावर आनंद दिघे-बाळासाहेबांचा संस्कार आह. आमच्यावर टीका करता. पण आम्ही बोलायलो लागलो, तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले, देवेंद्र फडणीसांना तुम्ही कलंक म्हणता. पण एकनाथजी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, हे देवेंद्रजींचे शब्द आहेच. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत फक्त पन्नास आमदारा असतांना मला मुख्यमंत्री केलं. त्यांनी अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारालं. याला मनाचा मोठेपणा म्हणतात, महाकलंक तर तुम्ही आहात. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करू शकले. पण, त्यांनी तुम्हाला पालिका बिनविरोध दिली. आणि आज तुम्ही त्यांच्यावरच टीका करता, हा कृतघ्नपणा असल्याची टीका त्यांनी केला.
शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आमच्या सैनिकांवर गुन्हे दाखल होत होते. आपल्या सैनिकांच्या केसांनाही धक्का लागणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. सत्ता येते आणि जाते. पण सत्ता नसतानाही लोक तुमच्यासाठी थांबले पाहिजेत. जो इतरांचे दुःख कमी करण्याचे काम करतो तोच खरा माणूस. मी शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असं शिंदे म्हणाले.