ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; फडणवीसांकडून शिंदेंना बळ

मुंबई : शिवसेना शिंदे गटाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे (Smita Thackeray)यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यानंतर आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde)कौतुक केलंय. आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे होता, असंही स्मिता ठाकरे यांनी म्हटलंय. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात स्मिता ठाकरे […]

Ekanath Shinde Fadnavis

Ekanath Shinde Fadnavis

मुंबई : शिवसेना शिंदे गटाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे (Smita Thackeray)यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यानंतर आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde)कौतुक केलंय. आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे होता, असंही स्मिता ठाकरे यांनी म्हटलंय.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात स्मिता ठाकरे बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आणि शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आलाय. या कार्यक्रमात स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय.

पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या सातवर

यावेळी स्मिता ठाकरे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री आहेत. ते सतत काम करत असतात, झोप, वेळ काळ काही नाही, फक्त काम त्यांच्या डोक्यात असतं. ते फक्त तीन तास झोपतात. त्यांचा दिवस इतक्या लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो. त्यांच्या कामात गती आहे, त्यामुळं ते सर्वांचे लाडके मुख्यमंत्री झालेत.

उद्धव ठाकरेंना टोला लगावत स्मिता ठाकरे म्हणाल्या, शिंदे एवढे उपक्रम हाती घेतात, महिलांसाठी काम करतात, बाल विकासासाठी कामं करतात. ही काय खायची गोष्ट नाही. त्याला फक्त एक आवड लागते. एकनाथ शिंदेंना आम्ही खूप वर्षांपासून ओळखतो. हे त्यावेळचे एकनाथ शिंदे जेव्हा ते साहेबांचे शिलेदार म्हणून ओळखले जायचे.

त्यांनी आज बारा बाय बाराच्या खोलीतून वर्षावरचा जो प्रवास आहे, तो काही साधा नाही. त्यामागे काही खडतर प्रयत्न आहे, त्यामुळं ते आज या खुर्चीवर आहेत. आम्हाला असाच मुख्यमंत्री हवा होता. नुसतं वारसदार, वारसदार करुन चालत नाही. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण? असाही सवाल स्मिता ठाकरे यांनी यावेळी केलाय.

Exit mobile version