Eknath Shinde : शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे आहेत हे न्यायालयाने मान्य केले आहेत. तसेच बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला मान्यता देण्यात आली हे चुकीचं असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे, या सुनावणीदरम्यान पक्षात फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून कसे काढण्यात आले आहे. हे पत्र लेट्सअप मराठीचा हाती आले आहे.
20 जून ते 21 जून दरम्यान शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदार सुरत घेऊन गेले होते. तेथून ते गुवाहाटीला गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावर हटविले होते. तेव्हा आमदार रविंद्र वायकर हे सूचक होते. तर मंत्री उदय सामंत, दादा भुसे, आमदार संजय राठोड हे अनुमोदक होते. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली मंगळवारी 21 जून 2022 रोजी विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांची बैठक वर्षा बंगल्यावर झाली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावरून तत्काळ दूर करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तर या पदावर अजय चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली होती.
एकनाथ शिंदे यांना गेटनेतेपदावरून हटविण्यासाठी सूचक व अनुमोदक असलेले मंत्री व आमदारनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फुटीत सहभागी झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अनुमोदक असलेल्यांना खातेही देण्यात आले होते.
