Download App

‘कम ऑन कील मी’ वरून सोशल मीडियावर वॉर; शिंदे शिवसेनेकडून ठाकरेंवर टिका

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या 'कम ऑन कील मी' या वक्तव्याची सोशल मीडियावरून

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या ‘कम ऑन कील मी’ या वक्तव्याची सोशल मीडियावरून सध्या खिल्ली उडवली जात आहे. शिवसेनेने त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मार्मिक व्यंगचित्राद्वारे घेतला आहे. काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेत शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे असे व्यंगचित्र काढून त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा मेळावा वरळी येथे पार पडला. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तर, उबाठा गटानेही कालच्याच दिवशी वर्धापन दिन साजरा केला.

या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ‘कम ऑन कील मी’ हे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असून त्यावरच्या मीम्सचा पाऊस पडत आहे. मात्र, शिवसेनेने सध्याच्या राजकीय स्थितीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या एका हाती शरद पवारांची कुबडी दाखवून त्यांचे पाय लटपटत असल्याचे दाखवले आहे. तर, हिरव्या रंगाच्या काँग्रेसरुपी सिलेंडरने ते श्वास घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेऊन आणि शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

 

तसेच, काँग्रेसची सोबत करून शिवसेनेच्या मूळ विचारांना उद्धव ठाकरे विसरल्याचे शिवसेनेने या व्यंगचित्रातून अधोरेखित केले आहे. दरम्यान, शिवसेनेने उद्धव ठाकरेंची अवस्था दाखवणारे हे व्यंगचित्र आपल्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध केले असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

इस्रायल-इराण तणाव अन् भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कमावले 5 लाख कोटी; कारण काय? 

follow us