Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ४० आमदार आणि १२ खासदारांसह अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दुपारी त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी सर्व आमदार, खासदार यांच्यासह लक्ष्मण किल्ल्याला भेट दिली. त्यावेळी तेथील जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, राहुल गांधी, अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यावेळी त्यांनी ‘अयोध्या मे राम मंदिर बनाया है, अब तो भगवा लहरायगा पुरे हिंदुस्थान पर’, अशी घोषणा केली.
अयोध्या येथील लक्ष्मण किल्ला येथे जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ‘अयोध्या मे राम मंदिर बनाया है, अब तो भगवा लहरायगा पुरे हिंदुस्थान पर’, अशी घोषणा देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासारख्या काही जणांना हिंदू धर्माची, हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. तर काही जण सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे.
मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला : रावणराज चालवले… म्हणूनच जनतेने त्यांना हटवले! – Letsupp
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या दौऱ्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. मात्र, माझ्या आयुष्यातील आजचा सर्वात मोठा आंनदाचा दिवस आहे. उद्धव ठाकरे यांचेच रावणाच राज्य होते. त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणून त्यांना जनतेने हटवले आहे.
उद्भव ठाकरे हे टीका करायचे की, मंदिर वही बनायेंगे पर तारीख नाही बतायेंगे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधलं आणि तारीख देखील सांगितली आहे. त्यामुळे पहिले मंदिर फिर सरकार हे बोलणारे कुठे आहेत? असे आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळेच ‘अयोध्या मे राम मंदिर बनाया है, अब तो भगवा लहरायगा पुरे हिंदुस्थान पर’, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.