Download App

Exit Poll आला! कसब्यात भाजपला धक्का तर चिंचवडमध्ये जागा राखणार!

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba-Chinchwad Bypoll) खासगी संस्थेने केलेला एक्झिट पोल आखेरमंगळवारी रात्री उशिरा जाहीर केला. त्यात कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवड मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.

स्टेलिमा या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार कसब्यात भाजपला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या कसबा पेठमध्ये काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून धंगेकर यांना ७४ हजार ४२८ मते मिळू शकतात. तर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ मते मिळण्याचा अंदाज आहे.

MPSC Exam मुलांमध्ये प्रमोद चौगुले तर मुलींमध्ये सोनाली मात्रे राज्यात प्रथम!

तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपाला जागा राखण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना १ लाख ५ हजार ३५४ मते मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९३ हजार आणि राहुल कलाटे यांना ६० हजार १७३ मते मिळण्याचा अंदाज आहे.

Tags

follow us