फेसलेस आंदोलनामध्ये समाजकंटक, पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर… दिल्लीतील आंदोलनावर फडणवीसांना संशय

Fadnavis suspects Delhi protest दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

Fadnavis Suspects Delhi Protest

Fadnavis Suspects Delhi Protest

Fadnavis suspects Delhi protest involved anti-social elements situation spiraled out of control had police not stepped in : देशाची राजधानी दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो तरुण आंदोलन करत आहे. या ठिकाणी आंदोलक तरूणांवर झालेल्या लाठीचार्जमुळे देशभर संतापाची लाट उसळलेली असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण त्यावेळी संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे. कुणीही परवानगी घेऊन आणि शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि असे आंदोलनं करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण जाणीवपूर्वक राजकीय अशाांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलनं करणे हिंसा करणे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

तसेच ही गोष्टी निश्चित आहेत की, फेसलेस आंदोलन असलं की, काही प्रवृत्ती आंदोलनामध्ये घूसून आपले स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. तसेच काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्यासाठी तेथे गेले. तसेच काही संबंध नसलेल्या संघटना अराजकाता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठी चार्ज करायला आवडत नाही. मात्र दिल्लीतील सोमवारची परिस्थिती अशी होती की, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक घटना घडल्या असत्या. पोलिसांनी संयमही दाखवला. तसेच या आंदोलनातील काही लोक चांगल्या भावनेने देखील तेथे गेले होते.

Exit mobile version