Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,अशा शब्दांत ठाकरे यांनी टीका केली.
ते पुढे म्हणाले, पोलिसांनी मुंब्रयात भाडोत्री गुंडांना प्रवेश द्यायला नको होता. त्यांना संरक्षण द्यायला नको होतं. ज्यांचं अकलेचं दिवाळं निघालं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील दिवाळी खराब होऊ नये म्हणून आम्ही संयम पाळला. पण, याचा अर्थ असा होत नाही की दरवेळी आमच्याकडून संयम आणि तुमच्याकडून यम असं होणार नाही. दरवेळी तुम्ही असं वागणार असाल तर आमच्या संयमातील ‘स’ गेल्याशिवाय राहणार नाही. मी परत एकदा सांगतो पोलिसांना बाजूला ठेवा. जे व्हायचं ते होऊनच जाऊ द्या, असे ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : ‘मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं पण, शरद पवार’.. उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
त्याच ठिकाणी शाखा सुरू करणार
मागील 20-25 वर्षांपासून शिवसेनेची शाखा त्या ठिकाणी आहे. पण, या लोकांनी बुलडोझर आणून ती पाडली. खोके सरकार म्हणून एक खोकं आणून ठेवलं आहे. हे डबडं आम्ही तेथे ठेऊ देणार नाही. आमच्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. आम्ही टॅक्स भरला आहे. त्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची शाखा त्याच जागेवर पुन्हा सुरू केली जाईल.
शिवसेनेची शाखा जिथे होती तिथेच राहिल
डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात ठाण्यात आम्ही सभा घेणार आहोत. सत्तेच्या माजावर यांनी शाखा पाडली आणि आता घरं देखील पाडतील. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. आम्ही ठाण्यात आणि मुंब्र्यातही येऊन दाखवलं. सकाळी कुणीतरी ठाण्यात येण्याचं आव्हान दिलं होतं. आम्ही इथं आलो. गद्दारांना सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करत आहेत. आमच शाखा बुलडोझर लावून पाडली. पण आम्ही गप्प बसणार नाही. कारण ती आमची शाखा आहे. शिवसेना ही एकच आहे ती आमची आहे. त्यामुळं शिवसेनेची शाखा जिथे आहे तिथेच राहिल असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले? गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल