Download App

मी कोणाला सांगू, काश्मीरला जाताना माझी…, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा धक्कादायक विधान

Sushilkumar Shinde : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

  • Written By: Last Updated:

Sushilkumar Shinde : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. त्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जम्मू काश्मीरमधील लाल चौकात जाताना मला भीती वाटायची असा वक्तव्य केल्याने भाजपकडून (BJP) काँग्रेसवर (Congress) टीका करण्यात येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गृहमंत्री असताना काश्मीर गेल्यावर आपली मानसिक अवस्था काय होती, यावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी गृहमंत्री असताना विजय धर यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडून सल्ला देखील घ्यायचो, त्यांनी मला एक सल्ला दिला होता की, तू इकडे तिकडे भटकू नको, तू लाल चौकात जा आणि तिथे भाषण कर आणि लोकांना भेट. त्यांच्या या सल्ल्यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि लोकांमध्ये एक मेसेज देखील गेला की, असा एक गृहमंत्री आहे जो ना घाबरता लाल चौकात जातो, पण माझी …, मी कोणाला सांगू. असं वक्तव्य माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘पाच दशकांचे राजकारण’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना केले. तसेच मी हे तुम्हाला फक्त हसवण्यासाठी सांगितले, पण एक माजी पोलीस अधिकारी असे बोलू शकत नाही असेही यावेळी ते म्हणाले.

तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून आता काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये जास्त दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडायच्या पण भाजपच्या काळात काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे असा दावा केला आहे.

कलम 70 हटवण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये काय परिस्थिती होती हे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने शिंदे यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यावं, आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाचं कंबरडं मोडलं गेलं आहे आणि आज लाल किल्ल्यापासूल लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा फडकतोय. दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट झाली आहे असा दावा भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला आहे.

follow us