Download App

अनिल देशमुखांचे फडणवीसांवर खळबळजनक आरोप; ‘त्या’ पुस्तकातील पानंच केली व्हायरल..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

Anil Deshumkh Serious allegation on Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. दोन्ही नेत्यांत सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. आताही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात होणाऱ्या ईडीच्या कारवाया या देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेवरून होत होत्या असे सूचित करण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी त्यांच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकातून केला आहे.

अनिल देशमुख यांच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकातील काही पाने ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बंद दरवाजाच्या आडून खेळला गेलेला कपटी डाव. देवेंद्र फडणवीसांच्या दुताने त्यांच्याशी काय बोलणे करून दिले? फडणवीसांनी नेमकी कोणती ऑफर टाकली, नक्की त्यांचा प्लॅन काय होता? शरद पवार साहेबांना का वाटलं की सरकार २४ तासांत कोसळेल? असे सवाल देशमुख यांनी या ट्विटद्वारे केले आहेत.

गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्यामागे पवार, ठाकरे; परमबीर सिंहांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुन एक व्यक्ती माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता. यामध्ये आदित्य ठाकरे, अनिल परब, उद्धव ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा कट असल्याचा उल्लेख होता. मी या प्रतिज्ञात्रावर सहीच केली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्या मागे ईडी, सीबीआय लावून कारवाई घडवून आणली असा आरोप अनिल देशमुख यांनी या पुस्तकात केला.

२४ एप्रिलला माझं घर, कार्यालय, मुंबईतील सरकारी निवासस्थान आणि वरळी येथील माझा फ्लॅट अशा ठीकाणी सीबीआयने छापे टाकले. त्यावरून लक्षात आलं की छापे मला घाबरवण्यासाठी आहेत आणि आता पोलिसांतल्या गुड कॉप- बॅड कॉप थिअरीप्रमाणे आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होणार. माझी शंका निराधार नव्हती.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एक इसम मला भेटायला आला. मला देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं असं म्हणाला. देवेंद्रजी यांना तुम्हाला मदत करायची आहे. असंही तो म्हणला. फडणवीस फोनवर बोलू शकत नाहीत अशी कोणती गोष्ट असावी असं मला वाटलं. त्यानंतर त्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं. यात फडणवीस म्हणाले की भाऊ तुम्ही काळजी करू नका. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या केसेसमध्ये काही दम नाही.

असं आमचं बोलणं झालं आणि तो व्यक्ती निघून गेला. यानंतर पुढल्या भेटीत तो म्हणाला होता की ईडीचे लोक येतील. चौकशी करतील. त्यानंतर ईडीने माझ्या घरावर छापे टाकून कारवाई केली, असा खुलासा अनिल देशमुख यांनी या पुस्तकात केला आहे.

follow us