Download App

आता फक्त पाणी बंद केलं, येणाऱ्या काळात दाण्या-दाण्याला तरसाल; माजी खासदार नवनीत राणांची थेट पाकिस्तानला धमकी

Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी या दहशतवादी घटनेचा निषेध केला आहे. आता, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या घटनेवर मोठे विधान केलंय.

जम्मू-काश्मीरच्या पहेलगांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून पर्यटकांना ठार केलाय. यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज नवनीत राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ चौकामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन केले (Navneet Rana Warning to Pakistan) होते. तेव्हा माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानला धमकी दिली. मोदींजींनी आम्हाला हिंमत दिली आहे. घाबरायचं नाही, तर लढायचं आहे, असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलंय.

“मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की..” पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रणावरून ट्रोल झाल्यानंतर नीरजचं वक्तव्य

या देशात पंतप्रधान मोदी आणि अमित शहासारखे गृहमंत्री आहेत. आता सध्या पाणी बंद केलंय, येणाऱ्या काळात तुम्ही दाण्या दाण्याला तरसाल. तसेच एका खुनाचा बदला दहाने घेऊ आणि दहा खुनांचा बदला हजाराने घेऊ. आम्ही पहिलेही भीत नव्हतो अन् आताही भीत नाही. तुम्ही फक्त भीती निर्माण करण्यासाठी भारतात आले, आम्ही तुम्हाला भीतीने खत्म करायला पाकिस्तानात येऊ, असे म्हणत राणा यांनी पाकिस्तानला धमकावले आहे.

सरकारने फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा; प्रचार करण्यात..पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचा संपादकीयमधून सल्ला

ज्या पद्धतीने हिंदुस्तानामध्ये दहशतवाद्यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून डोळा ठेवून आहे. त्या लहान मुलाचा बाईट पाहून समजलं, की कपडे काढेपर्यंत त्यांनी परीक्षा घेतली. बायकांच्या समोर नवऱ्याला मारण्यात आलं. या क्रूर पद्धतीची घटना घडली. अनेक पत्रकार पाकिस्तानमधून बोलत आहे, तुम्ही येवून तर बघा. आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत.

 

follow us