Download App

विखेंच्या अडचणी वाढल्या : थोरात यांच्या जोडीला आता कोल्हेही मिळाले!

  • Written By: Last Updated:

अशोक परुडे:प्रतिनिधी

Radhkrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhkrishna Vikhe ) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात सध्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष दिसून येते. नुकताच बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याने हे पाहिले आहे. निळवंडेच्या प्रकल्पावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघे एकमेंकाना डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही. संगमनेरमध्ये विखे खूप सक्रीय झाले आहेत. त्यामुळे थोरात हे आता विखेंच्या मैदानात उतरले आहेत. तेही विखेंच्या ताब्यात असलेल्या गणेश सहकारी कारखान्याच्या (Ganesh sugar factory election) सार्वत्रिक निवडणुकीत. साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच विखे- थोरात आमने-सामने आलेत. या कारखान्यासाठी कोल्हे व विखे यांच्यात राजकीय संघर्ष व्हायचा. त्यात थोरातांनी एंट्री मारली आहे. थोरातांना भाजपमध्ये असलेल्या कोल्हेंची साथ मिळाली आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत रंगतदार होणार आहे.(ganesh-sugar-factory-election-balasaheb-thorat-vs-radhakrishna-vikhe)

CM शिंदेंचे थेट शिवसेना भवन लक्ष्य; ठाकरेंचा पडद्यामागील शिलेदार लावला गळाला

हा कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी एकेकाळी माजी खासदार बाळासाहेब विखे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष होत होता. आलटून-पालटून दोघांच्या ताब्यात या कारखान्याची सत्ता येत होती. विखे यांची सत्ता या कारखान्यावर असताना १९८८ मध्ये हा कारखाना बंद पडला. त्यानंतर माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांची सत्ता आली. तब्बल पंधरा वर्ष कोल्हे यांच्या ताब्यात हा कारखाना होता. त्यानंतर पुन्हा हा कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बंद पडला. त्यानंतर डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्त्वाखाली विखे सहकारी कारखान्याने हा कारखाना चालविण्यास घेतला आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र शिर्डी, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे हा कारखाना विखेंसाठी राजकीयदृष्टा महत्त्वाचा आहे. त्यामुळे विखेंना हा कारखाना ताब्यात ठेवायचा आहे.

Jitendra Aawhad : पराभवापासून वाचण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच दंगली घडवतयं; आव्हाडांचा गंभीर आरोप

त्यात प्रथमच थोरात यांनी या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. थोरातविरोधात विखे हे संगमनेरमध्ये ताकद लावत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत, बाजार समितीच्या निवडणुकीत हे दिसून आले. निळवंडे प्रकल्पावरून दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यामुळे विखेंना शह देण्यासाठी थोरात यांनीही विखेंच्या मतदारसंघात ताकद लावली आहे. या कारखान्यात थोरात, कोल्हे, विखेंचा पॅनेल अशी तिरंगी लढत होईल, अशी शक्यता होती. थोरात यांच्याबरोबर राष्ट्रवादीत असलेले त्यांचे भाचे संग्राम कोतेही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीही थोरात यांच्याबरोबर असल्याचे बोलेले जात आहे. पण आमदार आशुतोष काळे यांनी अद्याप आपल्या भूमिका जाहीर केलेली नाही.

परंतु एेनवेळी भाजपमधील कोल्हे हे थोरात यांच्याबरोबर आले आहेत. संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गणेश कारखान्याचे 15 गावचे कार्यक्षेत्र आमच्या विधानसभेत येते. कारखाना वाचण्यासाठी आम्हाला लढावे लागणार असल्याचे कोल्हे यांची भूमिका आहे. त्यामुळे थोरात-कोल्हे असा पॅनेल विखेंविरोधात उभा ठाकला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे यांनी आठ उमेदवार उभे केले आहेत. आता गणेशचे सभासद कुणाला साथ देतात, थोरातांना विखेंविरोधात किती यश येते हे १७ जून मतदानानंतर स्पष्ट होईल.

Tags

follow us