भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे ( NCP ) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे 2019 साली भाजपमध्ये येणार होते. त्यासाठी ते प्रयत्न करत होते, असा दावा महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
याआधी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये मला छळण्यात आले असा आरोप केला होते. तसेच मला जेलमध्ये टाकण्यात ज्या अदृश्य शक्तींचा हात होता त्या लवकरच समोर येतील, असे ते म्हणाले होते. त्यावर महाजन यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीच्या आधी देशमुखांनी आम्हाला अनेकद्या विनवण्या केल्या होत्या. अनेकवेळा त्यांनी मला भाजपमध्ये घ्या असे सांगितले होते, असा दावा महाजन यांनी केला आहे. त्यामुळे महाजन यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान अनिल देशमुख हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. त्यांना ईडीने मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केली होती. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग याने त्यांच्यावर 100 कोटी वसुली करण्याचे आरोप केले होते. तसेच पोलिस अधिकार सचिन वाझेने देखील त्यांच्यावर आरोप केले होते. सध्या ते त्यांच्या नागपूच्या निवासस्थानी आहेत. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना माझा छळ झाल्याचा आरोप देशमुखांनी केला होता.