Gopichand Padalkar : ‘शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत’

धुळे :  कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये ( Dhule ) आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar )  यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार ( Sharad Pawar )  आणि संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जहरी टीका […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (16)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (16)

धुळे :  कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये ( Dhule ) आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar )  यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार ( Sharad Pawar )  आणि संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जहरी टीका केली असून राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केला.

आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती. धनगर समाजाला आरक्षणास विरोध करणारे लोक देखील शरद पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एकच आहे. म्हणून मी दर वेळेस पवारांवरच बोलतो. शरद पवारांनी आधीपासूनच घान व निच काम केले आहे, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घनाघाती आरोप लावत निशाणा साधला आहे.

सरकार पडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. म्हणून , त्यांच्याकडे लक्ष देऊ नका सरकार फुल स्ट्रॉंग आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान शरद पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने, पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडलेला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावरती शिक्कमोर्तब केला होते.  देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच वाक्य टाकल्यामुळे शरद पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरा सारखा काळा झाला, असं म्हणत त्यांनी पहाटेच्या शपथविधी वर बोलताना  पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version