नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर असलेले अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अनेक आमदारांनी तशी जाहीर कबुली दिली आहे. भरत गोगावले (Bharat Gogawale ) हे गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिपद मिळून मी रायगडचा पालकमंत्री होईल, असे जगजाहीर सांगत आहेत. आज पुन्हा त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भाष्य केले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद माझी वाट पाहतंय, असे गोगावले यांनी म्हटले आहे.
राणेंनी सलिम कुत्तासोबत व्हिडिओ दाखवला, पण अंधारेंनी पिक्चरच दाखवला
हे अधिवेशन संपल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मी त्यात असणार आहे. त्याबाबत दुमतच नाही. तर रायगडचा पालकमंत्री ही असेल, असे गोगावले यांनी म्हटले आहे. तर आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवावी. आम्हाला त्यांचा सारखाच उमेदवार विरोधात हवा आहे. मात्र त्यांनी आधी वरळी विधानसभा सांभाळावी. मग लोकसभेचे बघावे, असा टोलाही गोगावले यांनी ठाकरेंना लगावला आहे.
बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत पार्टी केल्याचा आरोप, बडगुजरांनी केला खुलासा, ‘माझा सलीम कुत्ताशी संबंध…’
कर नाही, त्याला डर कशाला ?
दिशा सालियन प्रकरणातही गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दिशा सालीयन प्रकरणात आधीच्या तपासात काही त्रुटी राहिल्या असाव्यात म्हणून एसआयटी स्थापित करावी लागली आहे. जर आदित्य ठाकरेंचा सहभाग नसेल तर ते चांगले आहे. त्याला कर नाही, त्याला डर कशाला पाहिजे. तुम्हाला क्लिनचिट मिळेल असा आत्मविश्वास असेल तर चौकशीला सामोरे जाईला हरकत नाही.
भुजबळांनी इतर समाजाचे मने दुखवू नयेत
ओबीसींची बाजू मांडताना इतर समाजाची मन दुखावतील अशी वक्तव्य छगन भुजबळांनी करू नयेत, असा सल्लाही गोगावले यांनी भुजबळांना दिला आहे. भुजबळ सत्तेत आहेत, मग त्यांना सरकारवर विश्वास नाही का?
या प्रश्नावर सोमवारी नागपूरमध्ये गेल्यावर विचारतो, असेही गोगावले यांनी म्हटले आहे.