पवार म्हणजे वैचारिक व्हायरस; सदावर्तेंनी ‘गुण’ उधळले

Gunratn Sadawarte On Sharad Pawar :  निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. आज पुन्हा एकदा सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. […]

Letsupp Image   2023 06 12T184253.377

Letsupp Image 2023 06 12T184253.377

Gunratn Sadawarte On Sharad Pawar :  निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. आज पुन्हा एकदा सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आहेत. पवारांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभरात लसीकरण सभा घेणार असल्याचे सदावर्तेंनी सांगितले आहे. काय तर म्हणे शरद पवारांना धमकी आली. यांना कोण धमकी देईल. मागणी करायला देखील मुलगीच गेली. दाऊद इब्राहिम कुणाच्या काळात फळला-फुळला, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

त्यामुळे येत्या काहीदिवसांपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवार वैचारिक व्हायरस यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्यापासून आम्ही राज्यभर रॅली काढणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी गेल्या काही काळापासून कायम शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना सदावर्ते यांनी एसटीचे आंदोलन केले होते. त्यावेळी अचानकपणे एसटी आंदोलक व त्यांचे कुटुंबीय शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सदावर्तेंना अटक केली होती.

Maharashtra Politics : भाजप CM शिंदेच्या मुलाला का करतयं टार्गेट?; राष्ट्रवादीनं शोधलं उत्तर

तसेच त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला. नथुराम गोडसेंचा फोटो लावल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. यावर नथुराम गोडसे यांच्यावर अन्याय झाला होता, असे त्यांनी म्हटले.

Exit mobile version