Download App

भाजप नेत्यांनी चांगली वागणूक दिली पण त्यांना…; हर्षवर्धन पाटलांनी A टू Z सगळचं सांगितलं

भाजपच्या नेत्यांनीही चांगली वागणूक दिली, पण दुर्दैवाने माझ्या बाबतीत जुन्या पक्षातील नेत्यांना तोडगा काढता आला नाही.

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Patil : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मोठं इनकमिंग सुरु आहे. आज  हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भाजपसाठी (BJP) धक्का मानला जात आहे. दरम्यान, आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपबाबत मोठं विधान केलं. भाजप नेत्यांनी चांगली वागणूक दिली, पण त्यांना माझ्या बाबतीत तोडगा काढता आला नाही, असं ते म्हणाले.

लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळातील बापाची थरारक गोष्ट! ‘द AI धर्मा स्टोरी’चा रंजक ट्रेलर रिलीज 

हर्षवर्धन पाटील हे विधानसभेसाठी भाजपकडून इच्छूक होते. मात्र, इंदापूर मतदारसंघ सध्या अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळं महायुतीत हा मतदारसंघ अजितदादा गटाकडेच जाणार होता. त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याची चर्चा आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून लोकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. त्यामुळे जनतेच्या रेट्यामुळे पक्षांतरचा निर्णय मी घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

भारताला ‘सुवर्ण’ क्षण दाखवणाऱ्या जिम्नॅस्ट दीपा करमाकरने जाहीर केली निवृत्ती 

पुढं ते म्हणाले की, आम्ही पाच वर्ष भाजपमध्ये काम केलं. भाजपच्या नेत्यांनीही चांगली वागणूक दिली, आम्हाला राज्यस्तरावर काम करतांना पक्षात सामावून घेत गेले. त्याबाबत काहीच दुमत नाही. मात्र, राजकारणात काही असे प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये माणूस पर्याय काढतो. पण दुर्दैवाने माझ्या बाबतीत जुन्या पक्षातील नेत्यांना तोडगा काढता आला नाही. शेवटी त्यांना सांगूनच मी हा निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, मी आणलेले प्रोजेक्ट 50 टक्के बंद पडले, इंदापूरची औद्योगिक पीछेहाट झाली. आणि युवकांसाठी रोजगार निर्माण करता आला नाही. इंदापूर तालुक्यातील विधायक प्रश्न सोडवायचे असतील तर जाणकार नेता हवा होता. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचं पाटील म्हणाले.

पवार अनुभवी नेते आहेत. आज राज्यात त्यांच्या एवढा अभ्यास कोणाचा नाही. पवार साहेब जी जबाबदारी देतील, ती योग्यपणे पार पाडू, असा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी दिला.

follow us