Download App

भविष्यात नियतीच्या मनात काय सांगता येत नाही; अजितदादांच्या CM पदाबाबत मुश्रीफांचे मोठे विधान

  • Written By: Last Updated:

Hasan Mushrif’s big statement : अजित पवारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. राज्यभरात त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना या ना त्या मार्गाने शुभेच्छा देत आहेत. तसेच कार्यकर्ते बॅनर लावून भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शुभेच्छा देत आहेत. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केले आहे. (Hasan Mushrif’s big statement about Ajit Pawar’s post as Chief Minister)

पोस्टर लावून मुख्यमंत्री होता येत नाही त्यासाठी 145 आमदार लागतात असं अजित पवार यांनी यापूर्वी सांगितल आहे. असे मुश्रीफ म्हणाले पण भविष्यात नियतीच्या मनात असेल तर सांगता येत नाही. असं सूचक वक्तव्य यावेळी त्यांनी केलं. मनात असलेलं प्रेम यामुळे वाढदिवसानिमित्त अनेक जण आपल्या भूमिकेतून मांडत असतात. त्यामध्ये काही वावगं नाही.

पुढे शेतकरी प्रोत्साहन अनुदानाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणतात प्रोत्साहानपर अनुदानाची राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी केवायसीमुळे थकली होती. पण आता प्रक्रिया सुरू असून येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांना खात्यावर पैसे मिळतील.

‘मी आधीच सांगितलं होतं की, अजितदादा लवकरच’.. राऊतांनी शिंदे गटाला दिला खोचक सल्ला

पुढे पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्या विषयी विचारले असता मुश्रीफ म्हणतात ते आमचे नेते, आमचे दैवत तसेच ते आमचे विठ्ठल आहेत. परंतु काही राष्ट्रवादीचे जुने नेते आम्हाला पक्षातून काढून टाकणार अस बोलतात, आम्हाला कारणे दाखवा नोटीस बजावीत आहेत, त्यामुळे आपला पक्ष हा राष्ट्रवादी असून अजितपवारांच्या नेतृत्वाखाली आहे आणि राहील.पक्ष आणि कुटुंब एक संघ ठेवावे अशी विनंती शरद पवारांना केलेली आहे.

 

Tags

follow us