मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेदरम्यान आदित्य ठाकरेंनी अनेकदा दिल्लीत फोन केले मात्र कोणी आलेच नाही, मी पुढे आलो तेव्हा आदित्य ठाकरेंना मी सांगितलं की तुम्ही बहुमत सिध्द झाल्याचं पत्र घेऊन तेव्हा आदित्य ठाकरे निराश होऊन बाहेर गेल्याचं माजी राज्यपाल भगतसिंह यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेदरम्यान घडलेल्या गोष्टींबाबत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रंगवून सांगितले आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेंची झालेल्या पंचाईतीबाबतही त्यांनी रंगवून सांगितलंय.
कोश्यारी बोलताना पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेदरम्यान, ज्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं ते तब्बल तीन दिवस पुढे येत नव्हते. आदित्य ठाकरे माझ्याकडे आले, ते म्हणाले, आमच्याकडे बहुमत आहे, सत्तास्थापन करायचीय, तेव्हा मी मुख्यमंत्रिपदावर बसणारा नवरदेव कोण आहे, त्यांना बोलवा शपथविधी करुन घेऊ, तेव्हा ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते तब्बल तीन दिवस पुढे येत नव्हते, असं कोश्यारींनी सांगितलं आहे.
Sharad Pawar : शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले, महाविकास आघाडी..
तसेच मी जेव्हा तुम्ही बहुमत सिध्द झाल्याबाबतचं पत्र घेऊन माझ्याकडे या असं सांगितल्यानंतर आदित्य ठाकरे यांना निराश होऊन बाहेर जावं लागलं होतं, त्यांना त्यावेळी कसं वाटलं असेल? आदित्य माझ्या मुलासारखा आहे, माझ्या मुलाप्रमाणेच मी त्यांच्यावर प्रेम करत असल्याचंही माजी राज्यपाल कोश्यारींनी यावेळी सांगितलंय.
त्यावेळी मुख्यमंत्रिपदावर बसणारा नवरदेव येत नव्हता, त्यावेळी मी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांशी संपर्क साधला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मी हे चुकीचं असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्यांना एक पत्रतरी लिहुन पाठवा मी त्या पत्राचा स्वीकार करतो, असा सल्ला मी त्यांना दिला असल्याचंही कोश्यारी यांनी सांगितलं आहे.
Bhagat Singh Koshyari : इच्छा नसतानाही महाराष्ट्रात आलो, कोश्यारींचा राजीनाम्यानंतर गौप्यस्फोट!
एका राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव येतो आणि मुख्यमंत्री पदाचा माणूस येत नाही हे चुकीचं असून त्यानंतर यासंदर्भात माझं शरद पवारांशी बोलणं झालं होतं. तेव्हा तीन दिवसांनी माझ्याकडे महाविकास आघाडीच्यावतीने पत्र पाठवण्यात आल्याचा खुलासा माजी राज्यपाल कोश्यारी यांनी केला आहे, तसेच सत्तास्थापनेदरम्यान, उद्धव ठाकरे शकुनी मामाच्या फेऱ्यात अडकले असल्याची परिस्थिती झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, कायमच वादग्रस्त विधाने करण्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टार्गेट केलं जात होतं. एका कार्यक्रमाच्या भाषणात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना भाजपच्या एक केंद्रीय मंत्र्याशी केली होती. त्यानंतर कोश्यारींविरोधात राज्यभरात निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हकालपट्टीची मागणीही करण्यात आली होती.