Download App

रवींद्र धंगेकरांची उमेदवारी कशी फायनल झाली? नाना पटोलेंनी सांगितला किस्सा

Nana Patole on Ravindra Dhangekar : काही दिवासांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasaba By Election) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाला मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यांच्या या विजयाची चर्चा देशपातळीवर गेली होती. या पार्श्वभूमीवर कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोल्यात सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी कशी मिळाली याचा किस्सा आपल्या भाषणात सांगितला.

नाना पटोले म्हणाले की काही दिवसांपूर्वी कसब्याची पोटनिवडणुक झाली. कसब्याची जागा काँग्रेसकडे आली होती. आमच्याकडे पुण्यात मोठे मोठे नेते आहेत. त्यांच्यातून सर्वसामान्य माणसाला निवडणं कठीण काम होतं. एक सर्व्हे केला होता त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांची लोकप्रियता जास्त होती. मला माहिती नव्हतं ते कोणत्या समाजाचे आहेत. मला फक्त ते ओबीसी समाजाचे आहेत एवढंच माहिती होतं, असे नाना पटोले यांनी सांगितले.

प्रेस कॉन्फरन्स पवारांची पण चर्चा सोनियाची? मागे बसलेली ‘ती’ कोण

ते पुढं म्हणाले की जेव्हा मी पुण्यात जातो त्यावेळी कार्यकर्त्यांच्या घरी जेवायला जातो. एकदिवस रवींद्र म्हणाला की भाऊ माझ्या घरी जेवायला यायचं. मोठ्यांच्या घरी जेवायला जाता एकदा गरीबांच्या घरी जेवायला या. रवींद्र हुशार माणूस आहे. जेव्ही मी रवींद्रच्या घरी जेवायला गेलो त्यावेळी मला त्यांच्या कुटुंबाकडून खुप प्रेम मिळालं. तेव्हा कळालं की हे कुटुंब समाजसेवा करायला तयार आहे. जेवण झाल्यावर मी त्याला सांगितले की आता तुला नगरसेवक व्हायचे नाही. आता महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून यायचं आहे. अशी उमेदवारी त्याने फायनल करुन घेतली, असा किस्सा नाना पटोले यांनी सांगितला.

ते पुढं म्हणाले की योगायोग झाला की धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई झाली. त्या लढाईत मुनवादी व्यवस्थेला चारीमुंड्याचीत करण्याचे काम रवींद्र धंगेकर याने केलं. आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सांगोल्यात करण्यात आला. यावेळी नाना पटोले बोलत होते.

Tags

follow us