… अन् तेव्हा मी भारत सोडण्याचा निर्णय घेतला, करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर धक्कादायक खुलासा

Karuna Sharma Exclusive Interview : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते ध

Karuna Munde Exclusive Interview

Karuna Munde Exclusive Interview

Karuna Sharma Exclusive Interview : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर आता लेट्सअप मराठीशी (LetsUpp Marathi) बोलताना करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे. फक्त धनंजय मुंडे यांच्या भविष्यासाठी मी भारतसोडून ऑस्ट्रेलियात राहण्याचा निर्णय घेतला होता असा खुलासा करुणा शर्मा यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला.

या वेळी करुणा शर्मा म्हणाल्या की, 2013 मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा निधन झाला होता तेव्हा पंकजा मुंडे (Pankaja Munde) धनंजय मुंडे यांना खूप त्रास देत होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी मला सांगितले होते की, आता तुझा नाव घेऊन हे लोक मला खूप त्रास देणार तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी तुमचे नाव हटवते. तेव्हा मी ऑस्ट्रेलियात माझ्या कंपनीच्या मदतीने इम्पोर्ट – एक्स्पोर्टच काम करत होते. मी धनंजय मुंडे यांना सांगितले की, मी माझ्या पाठीमागून आणि मुलांच्या पाठीमागून तुमचे नाव हटवते. असं मी फक्त धनंजय मुंडे यांच्या भविष्यासाठी प्रेमात करण्यासाठी तयार होते असा खूलासा करुणा शर्मा यांनी लेट्सअपशी बोलताना केला.

नगरच्या पुढाऱ्यांची गाडी अडकली आमदारकीवर…मंत्रिपदासाठी ‘वेट अँड वॉच’

पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मात्र याबाबत धनंजय मुंडे यांनी विचार केला आणि मला सांगितले की जर तुला आणि मुलाबाळांना सोडून जर मला पद मिळत असेल तर मला पद नको आहे. मात्र धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आमच्या आयुष्यात काही दलाल लोक आले आणि त्यांनी फक्त पैशासाठी आमच्यात भांडणे लावली असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

Exit mobile version