Download App

मी औरंगजेबाला स्वप्नातही…, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसंतय. विरोधी पक्षाचे नेते अजित पवारांचं(AjitPwar) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विधीमंडळात ‘स्वराज्यरक्षक’ (swarajyarakshak)असा उल्लेख केला होता. त्यावरुन विरोधकांकडून राज्यभर या वक्तव्याचे पडसाद उमटले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendraavhad) यांनी देखील यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(chandrashekharbavankule) यांनी औरंजगेबाचा उल्लेख ‘औरंगजेब’जी असा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(AmolMitkari) यांनी पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेब’जी असा केल्याचे दिसून येतं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख केल्यानं शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी(sanjayraut) तर औरंजेबाचा थेट संबंध गुजरातशी जोडला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी आपली मत मांडून भूमिका स्पष्ट केलीय. त्यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिलीय.

बावनकुळे पत्रात म्हणतात, मी फक्त जितेंद्र आव्हाडांसाठी औरंगजेब कसा? हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सामना वृत्तपत्राकडून मी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेब’जी असा केल्याचं प्रसिद्ध केलं.

मात्र, पापी, क्रुरकर्मा औरंगजेब जितेंद्र आव्हाडांना कसा काय आदरणीय, प्रिय आणि आपुलकीचा व श्रध्दास्थानी आहे, हे सांगताना मी आव्हाडांसाठी ‘औरंगजेब’जी असं उपरोधिक पध्दतीनं म्हटलं. त्यांना उपरोधही समजू नये हे अनाकलनीय आणि दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

मी औरंगजेबाला स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही, हे पुन्हा सांगतो आणि इथून पुढेही आयुष्यभर सांगणार असल्याचं त्यांनी पत्रात स्पष्ट केलंय. तसेच ‘मी यापूर्वीच यावर स्पष्टीकरण दिलं असून सामना बहिरा आणि आंधळा झालाय. हे आता सांगायचीही गरज नाही. सामनाचे अंतरंग व बाह्यरंग हिरवे झाले आहे. त्यांनी भगवा रंग काढून टाकावा अशीही टीका त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रशेखर बावनकुळेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर बावनकुळे यांनी आपली भूमिका पत्राद्वारे स्पष्ट केलीय. आता त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कोणती भूमिका घेतली जाते. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us