Download App

मतासाठी लोणी लावणार नाही, नाहीतर माझ्याजागी दुसरा कोणीतरी येईल; गडकरींकडून राजकीय निवृत्तीचे संकेत

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यातच नागपूरमध्ये (Nagpur)रविवारी (दि.26) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात (social causes)जास्त रस असल्याचे सांगितले. कार्यक्रमात नितीन गडकरींनी माझं काम पटलं तर मला मत द्या नाही तर देऊ नका, मी आता मतासाठी फार लोणी लावणार नाही. नसेल तर माझ्याजागी दुसरा कोणीतरी येईल, अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे आता नितीन गडकरींनी एकप्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

या कार्यक्रमात गडकरींना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार (Mohan Dharia Nation Building Award)ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर (Padma Vibhushan Raghunath Mashelkar)यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमात बोलताना गडकरींनी मतं देण्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मराठी कलाकारांनी राजकारणात, विरोधी पक्षात असावं का ? अमोल कोल्हेंचा प्रश्न

गडकरी म्हणाले की, आता मलाही या कामात जास्त वेळ द्यायचा आहे, या कामातून भविष्य बदलू शकते. त्यांनी सांगितले की, जलसंवर्धनापासून, वातावरणातील बदलापर्यंत आणि पडीक जमिनींचा योग्य वापर यामध्ये प्रयोगाला भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करतोय. मी प्रेमाने नाही तर ठोकून काम करतो आणि भविष्यातही यातच जोमाने काम करणार आहे. या प्रयोगामुळे भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागात मोठा बदल होण्याची शक्यता असल्याचे यावेळी गडकरींनी म्हटले आहे.

गडकरी म्हणाले की, आपण वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगारनिर्मितीही होऊ शकते, असे गडकरी यांनी सांगितले. लोकांना पर्यावरणाचे महत्व कळत नसल्याचे यावेळी ते म्हणाले.

आपले हीतही लोकांना कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्वही समजत नसल्याचे यावेळी गडकरींनी बोलून दाखवले. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वातावरण बदल हा विषय काही लोकांचा असल्याचेही गडकरींनी म्हटले आहे.

Tags

follow us