Manikrao Kokate : अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही

If Ajit Pawar leaves the NCP, there will be nothing left in the party : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित […]

Untitled Design   2023 04 17T214926.791

Untitled Design 2023 04 17T214926.791

If Ajit Pawar leaves the NCP, there will be nothing left in the party : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपला अनुकूल अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळं अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं बोलल्या जातं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं विधान केलं होतं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर आपलं मत व्यक्त केलं.

कोकाटे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. कोकाटे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी ही कोणाची संस्था नसून शरद पवारांच्या मालकीचा पक्ष आहे. अजित पवार हे कॉंग्रेसची महत्वपूर्ण संपत्ती आहे. अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले तर आमदारांनी विश्वास ठेवावा, असा कोणता नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोंडी होते असे म्हणता येणार नाही. पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोकाटे म्हणाले की, उगाच अंदाज व्यक्त करत नाही. मी अंदाजावर भाकीत करत नाही, जशी परिस्थिती निर्माण होईल, तसे निर्णय घेण्यात येतील. जो निर्णय होईल, त्याला आम्ही बांधील आहोत. सरकार पडणार नाही, हे सत्यच आहे. 16 आमदार अपात्र ठरल्याने सरकार पडणार नाही, असं कोकाटे म्हणाले.

Breaking! उद्धव ठाकरेंना दिल्लीचे निमंत्रण, राहुल गांधी, सोनिया गांधींना भेटणार

ते म्हणाले की, महाराष्ट्रातून भाजपला 10 ते 15 लोकसभेच्या जांगावर सिट मिळू शकत नाही. मोठ्या प्रमाणात जागा या विरोधकांना मिळणार आहेत. हे भाजपला परवडणार नाही, म्हणून भाजप वेगळा विचार करू शकतो, चाचपणी करू शकतो, वेगळे पर्याय पडताळू शकतो. हे सर्व साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोकाटे म्हणाले की, ग्रामीण भागात राष्ट्रवादीला कॉंग्रेसला चांगली आवक आहे. उध्दव ठाकरेंनी सहानुभूती आहेत, त्यांच्या पक्षाची शहरी भागात चांगली पकड आहे. पण, त्यांनी शहरी भागात शिंदे सेनेमुळे विभाजन आहे. तसे राष्ट्रवादील कुठेही नाही म्हणून भाजपकडून पर्याय तपासले जात असतील.

दरम्यान, अजित पवार जी भूमिका घेतील, तिच माझी भूमिका असेल, असं आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. मी हे यापूर्वीही सांगितलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मी काल, आज आणि उद्याही अजित पवारांसोबत असेल असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version