ठाणे : काल ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदें यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshani Shinde) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाधमांशी संवाद साधत शिंदे गटावर जोरदार टीका केली. दरम्यान, आता रोशनी शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिघे (Dighe) साहेब असते तर आज एकेकाला फोडून काढलं असतं, असं त्यांनी सांगितलं.
रोशनी शिंदे यांनी बोलतांना सांगितलं की, ठाण्यात फक्त आाता गुंडगिरी आहे. इथं आता गुंडगिरीशिवाय काहीही राहिलं नाही. काल माझ्यावर हल्ला झाला. आमचे आनंद दिघे साहेब असते तर आज एकाएकाला त्यांनी फोडून काढलं असतं.
त्या म्हणाल्या की, महिलांवर हात उचलणं ही दिघेसाहेबांची शिकवण कधीच नव्हती. बाळासाहेबांची शिकवण नव्हती. आज आम्ही पण महिला आहोत. शिवसेनेत कार्यरत आहोत. पण आम्ही कधी कुठल्या महिलेवर हात उचलला नाही. आणि भविष्यात कधी उलचणार देखील नाही, असं त्यांनी सांगितलं.
काल ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाला. या हल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही शिवसेना (शिंदे गटाच्या) महिला कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप होत आहे. ठाण्यातील कासरवडवली इथं त्यांच्यवर हल्ला झाला. रोशनी शिंदे ह्या आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असतांना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. गर्भवती असतांना पोटात लाथा मारल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nitin Gadakari : या देशात देशासाठी सावरकरांनी त्याग केला नसेल, तर कुणीच त्याग केला नाही
दरम्यान, या प्रकरणानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले होत आहेत. उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात गुन्हेगारी वाढते आहे. महिलांवर हल्ले होत आहेत आणि गृहमंत्री हातावर हात ठेऊन आहेत. ते कुठलीही कारवाई करत नाहीत. आपल्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे, त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर आता रोशनी शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. दिघे साहेब असते तर त्यांनी एकेकाला फोडून काढलं असतं. ठाण्यात आता फक्त गुंडगिरी राहीली आहे, असं त्या म्हणाल्या.