Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाने काल 6 फेब्रुवारी रोजी संजीवराजे नाईक निंबाळकर अन् रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे टाकले होते. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्यातील घरावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी देखील हे छापेमारीचं सत्र सुरूच आहे. पुण्यात (Pune) आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याचं समोर आलंय.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ‘या’ मालिकेत दिसणार; कलाकार म्हणतोय, स्वप्न पूर्ण झालं…
संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच आहे. पुण्यात आज देखील संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकारी तपासणी करत आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर गोविंद दूध डेअरीबाबत चौकशी सुरु (Income Tax officer Raid) आहे. एकाचवेळी पुणे, फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहारांबाबत अधिकारी चौकशी करत आहेत.
संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच आहे. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेल्या 24 तासांपासून अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच असल्याचं समजतंय. फलटण आणि पुण्यातील संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी छापेमारी सुरूच आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याताील फलटणमधील ते एक वजनदार नेते आहेत. तर संजीवराजे आणि रघुनाथराजे हे माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू आहेत. सध्या संजीवराजे नाईक शरद पवारांच्या पक्षात आहेत.
बीडमधील दहशत कायम! संतोष देशमुख हत्येच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण
काल सकाळी सहा वाजता ईडीने विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर तालुक्यात देखील खासगी दूध प्रकल्पाशी संबंधीत अनेक ठिकाणी छापा टाकल्याचं समोर आलंय. काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल 17 तास चौकशी केल्याची माहिती मिळतेय. आयकर विभागाचे अधिकारी रात्री उशिरा बारा संजीवराजे यांच्या बंगल्यातून बाहेर पडले. त्यानंतर संजीवराजे यांनी घराबाहेर आले होते, त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.