मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Jayant Patil ED notice : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]

Jayant Patil

Jayant Patil

Jayant Patil ED notice : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली आहे.

Maharashtra political Crisis : …असा निकाल येऊ शकतो, अजित पवारांनी व्यक्त केली शक्यता

या नोटीसमध्ये जयंत पाटलांना ईडीची ही नोटीस आय एल अॅंड एफ एस या प्रकरणावर आली आहे. दरम्यान त्यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. तर त्याच्या काही तास अगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस येणे हा योगयोग असेल का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येणार? शिंदे, ठाकरे गटाची धाकधूक वाढली…

आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने 2019 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती.

Exit mobile version