Download App

‘अर्थमंत्रीपद राहिल की नाही?’ अजितदादांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Jayant Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) बंड करून अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेले. सध्या त्यांच्याकडे अर्थखातं आहे. दरम्यान, आज त्यांनी एक आश्चर्यकारक विधान केलं. माझ्या हातात अर्थ खातं आहे, त्यामुळं आपल्याला झुकतं माप मिळतं. पण पुढं ते टिकेल की नाही, हे ठाऊक नाही, असं विधान त्यांनी केलं. शिवाय, गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असतांना अजित पवार मात्र, मुंबईत नाहीत, त्यातच अर्थमंत्रीपदाविषयी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केलं. अजित पवारांवर अन्याय होतोय की, नाही याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा, असं पाटील म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

अजित पवारांनी केलेल्य वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या मनात दिसते आहे, म्हणून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, असं विधान केलं. दरम्यान, आता सत्तेत असूनही अजित पवार नाराज आहेत का? असा प्रश्न जयंत पाटलांना विचारला असता ते म्हणाले की, अजित पवार नाराज आहेत की, नाही? ते मला कसं माहिती असणार? भापजसोबत गेल्यावर त्यांच्यावर काय अन्याय होतो, य़ावर भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. भापजसोबत अजित पवार स्वखूशीने गेले आहेत. त्यांमुळं त्यांच्यावर काय अन्याय होतो? काय नाही, याचा त्यांनी; अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि ते करतील, असं पाटील म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले की, अजित पवार सावध आहेत, याचा मला समाधान आहे.

Maratha Reservation : शिंदे सरकारकडे 20 दिवस बाकी; मनोज जरांगेंनी सुरु केली बड्या आंदोलनाची तयारी

राज्याच्या काही भागात संततधार पाऊस सुरू आहे. मात्र, काही भागात अद्यापही पाऊस नाही. यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, दुष्काळाबाबत सरकार काहीही हालचाल करत नाही. सरकारकडून फक्त घोषणाच केल्या जात आहेत. मात्र, कारवाई होतांना सध्या दिसत नाही. सरकारकडून नियोजनाची कोणतीही बैठक घेण्यात आली नाही. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल आहे. सरकार आपली भूमिका मांडत नाही, सरकार निवडणुकांमध्ये गुंतलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गणेश मंडळांना भेटी देत ​​आहेत. ते योग्यच आहे, पण दुष्काळाकडेही लक्ष द्यायला हवे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार असल्याचं बोलल्या जातं. यावर बोलतांना पाटील म्हणाले की, ही सुनावणी ऑनलाइन झाली तर बरं होईल. त्यामुळंॉ कुणाला आक्षेप घेता येणार नाहीत. सगळ्यांना दोन्हीं बाजू कळतील, असं पाटील म्हणाले.

Tags

follow us