Jayant Patil : राज्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे सरकार असतांना युतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी शिवसेना पक्षाकडून देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला होता. दरम्यान आज वृत्तपत्रांमध्ये दुसरी जाहिरात प्रसिध्द झाली. त्यात सीएम शिंदेंसह फडणवीस यांचा फोटो झळकत आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. (jayant patil on eknath shinde and devdendra fadnavis over from advertisement)
आज राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकी झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलतांना यांनी आढावा बैठकीतील नेमकी काय चर्चा झाली, याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी जयंत पाटील यांनी कालच्या जाहिरातीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, हे सरकार काम कमी आणि जाहिराती जास्त करतं आहे. काल एकनाथ शिंदे यांच्या अज्ञात समर्थकाने एक जाहिरात दिली. देशात मोदी आणि राज्यात शिंदे अशी ही जाहिरात होती. त्या जाहिरातीत शिंदे हे फडणवीसांपेक्षा लोकप्रिय आहेत, असं दाखवलं. त्यांनी फडणवीसांवर कुरघोरी करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट भाजपला चांगलीच जिव्हारी लागलेली दिसते, काल जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर कोणीतरी डोळे वटारले दिसतात. त्यामुळं आज शिंदे गटाने दुसरी जाहिरात छापली. फडणवीस यांच्या फोटोसह ही नवी जाहिरात छापली, अशी टीका पाटील यांनी केली.
पहिले पतीला संपवलं अन् मग गूगलवर सर्च केलं लग्जरी जेल; वाचा निर्दयी पत्नीची स्टोरी
पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. पण, आज त्यांनी नवी जाहिरात दिली. त्यामुळं त्यांना घाबरवण्याचे काम चालू आहे की, काय अशी शंका वाटते. शिंदे हे सुरक्षित नसून त्यांच्यावर दबाव आहे. कोणीतरी त्यांना कसं वागायचं, याची मार्गदर्शक तत्वे जारी करतंय आणि तसं ते वागतात, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले, हे सरकार रोज जाहिराती छापत आहेत. त्यांना सामान्य जनते विषयी काही देणं घेणं नाही. वर्तमानपत्रांमध्ये रोज या लोकांची चेहरे पाहावे लागतात. जाहिरातीवरून या दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आलं असलं तरी हे सरकार कोसळणार नाही. कारण, भाजप हा सत्तेला चिकटणार पक्ष असल्याचं म्हणत पाटील यांनी भाजपलाही टोला लगावला.
गडचिलोरी मतदार संघात कॉंग्रेसला सोडणार का? असा प्रश्न विचारला असता, पाटील यांनी सांगितले की, जागा वाटपा संदर्भातील चर्चा अजून व्हायची आहे. मात्र, विदर्भातील चार जागांवर राष्ट्रवादीची लढण्याची तयारी आहे. त्यात गडचिलोरी, रामटेक, अमरावती आणि बुलढाणा या जागांवर राष्ट्रवादी लढू इच्छिते. त्यासाठी आजची आढावा बैठक होती. या बैठकीत मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
अमरावतीची जागा राष्ट्रवादीने लढवावी
शिवसेनेने अमरावती मतदार संघात अनेकदा उमेदवार दिला होती. कॉंग्रेसनेही उमेदवार उभा केला होता. आता महाविकास आघाडीत हे सगळे पक्ष एकत्र असतांना अमरावतीची जागा कुणाला मिळणार? यावर उत्तर देतांना पाटील म्हणाले, की, अमरावती लोकसभा यापूर्वी आम्ही लढवली. पण, त्या ठिकाणी काही तांत्रिक कारणांमुळे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यावेळी दोन्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी काम केलं. ही जागा राष्ट्रवादीने लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.