Download App

Jayant Patil : शिंदे-फडणवीस सत्तेसाठी लाचार; 60-70 आमदारांना निवडूण आणण्याइतकीच भाजपी ताकद

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : दोन दिवसांपूर्वी देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला. यावरून दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. (Jayant Patil said Shinde-Fadnavis desperate for power)

https://www.youtube.com/watch?v=Yc2Q59LsL1s

लोकप्रियतेच्या सर्वेक्षणाची जाहिरातीत मुख्यमंत्री शिंदे हेच महाराष्ट्रीतील मोठे नेते असून 26 टक्के जतनेची त्यांना पसंती आहे, असा मजकूर होता. त्यामुळं भाजप नेत्यांसह फडणवीसही नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर काल शिवसेने पुन्हा दुसरी जाहिरात दिली. त्यात दोन्ही नेत्यांचे फोटो होते. यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. पाटील म्हणाले, एकाने 26 टक्क्यांची जाहिरात दिली. त्यामुळं 23 टक्के पसंती असलेला नेता नाराज झाला होता. मग 23 टक्के कौल असलेल्या नेत्यांच्या बाजूच्यांनी 26 टक्के लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्यावर टीका केली. आता सह्याद्रीवर 26 टक्के आणि 23 टक्के सगळी नाराजी मिटवण्यासाठी बैठक सुरू आहे. या दोन्ही नेत्यांना कणाचा राहिला नाही, अशी टीका केली. सत्तेसाठी लाचार असलेल्या या लोकांना जनतेचं काही देणंघेणं उरल नाही, आगामी निवडणुकीत त्यांना दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात हाेणार साैर ऊर्जा प्रकल्प 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा दोंडाई इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा होता. तिथं सभेला संबोधित करतांना जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, जाहिराती द्यायचं आता काम नाही. मात्र, हे लोक सामान्य माणूस, शेतकरी यांच्याकडे दुर्लक्ष करून जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. निवडणुका घ्यायचं धाडस नाही, आणि केवळ लोकप्रिय असल्याचे दावे करत आहेत. आपण किती लोकप्रिय आहोत, हे सर्वेतून सांगायाची गरज नाही. लोकप्रियता तपासायचीच असले तर त्यासाठी निडणूक घ्या. एकदा राजीनामा द्या, विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुका घ्याच, मग कऴेल लोकप्रियता, असं आव्हानही पाटील यांनी दिलं.

यावेळी ज्ञानेश्वर भामरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेऴी पाटील म्हणाले, आमच्या पक्षातून अनेकजण बाहेर जातात. तिकडं त्यांना करमत नाही. सध्या भाजपची आमदारांची संख्या 105 आहे. मात्र, त्यातले बरेच आमदार हे दुसऱ्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आणि मग भाजपात गेले. 60-70 आमदारांना निवडूण आणण्याइतपतचं भाजपी ताकद आहे. बाकी आमदार ते उधारीवर आणतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

 

 

Tags

follow us