Download App

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री…’जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो’

NCP MLA Ajit Pawar : सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठं मोठया घटना घडत आहे. यातच सध्या राष्ट्रवादीमधून भावी मुख्यमंत्रीपदाची बॅनरबाजी सुरु आहे. एकीकडे हे सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मोठे विधान केलं होते. २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असे झाले तर जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो. असे पवार म्हणाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री पदावरून राजकीय नेते मंडळींकडून वेगवेगळी दावे केली जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर अनेक ठिकाणी झळकले होते. त्यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं विधान जयंत पाटील यांनी केले आहे. आता आपल्याच पक्षातील नेत्याच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो.

दरम्यान महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का? याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास फायदा हा निश्चितच होणार. आणि हे काही सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही, तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपाने एकनाथ शिंदेंना सोबत घेत सरकार अस्तित्वात आणलं, याला दहा महिने पूर्ण झाले, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही. अशा शब्दात पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Tags

follow us