Download App

“आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन….” NCERT ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांचा खोचक टोला

  • Written By: Last Updated:

मुघल काळातील अनेक संदर्भ काढून टाकल्यानंतर आता NCERT ने जगातील महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (Charles Darwin’s) यांचा उत्क्रांती सिद्धांत (Theory of Evolution) देखील विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता डार्विनचा हा सिद्धांत 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नसेल. बोर्डाच्या निर्णयावर आता प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर टीका केली आहे. टीका करताना ते म्हणाले की “आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील.”

Delhi Wrestlers Protest : महिला असूनही… ‘त्या’ वक्तव्यानंतर पहिलवानांच्या निशाण्यावर पीटी उषा

या प्रकरणी देशभरातील 1,800 हून अधिक शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विज्ञानाशी संबंधित लोकांनी NCERTच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून एक खुले पत्रही जारी केलं आहे. देशभरातून अनेक संस्थांकडून त्यावर टीका केली जात आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, “चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झाले ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका. म्हणजे बुद्धीप्रामाण्य वाद हा आता संपल्यात जमा.”

राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न

ते पुढे म्हणाले की, “म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील. ह्या बदल आम्हाला मान्य नाही असे पत्रक देश भरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. विरोध केला जातोय हे कौतूकास्पद आहे.”

Tags

follow us